लेख
फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
Google
चिऊचे घर चालले वाहून...
,
  प्रिंट करा  सेव करा

 ई-मेल करा

 प्रतिक्रिया नोंदवा

आनंद बोरा


चिमणी ... लहानपणी ज्या पक्षाशी पहिली ओळख होते ती चिऊताई . पण या चिऊताईची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . जागतिक चिमणी दिनानिमित ' मटा ' च्या वाचकांसाठी या पक्ष्याचा घेतलेला हा वेध ...

साधारण दहा वर्षापूर्वी गावात दाराला टांगलेल्या फोटो फ्रेममागे चिमण्या घरटी बांधायच्या . दिवसभर गवताच्या काड्या , पंेढ्यांच्या काड्या , जमवीत त्यात कापूस , धागे , पिसे , आणून घर सुशोभित करीत असत . या चिमण्यांच्या चिवचिवाटाची जणू प्रत्येक घराला सवयच झाली होती . जगभर आढळणारा आणि मानवाजवळ सतत वावरणारा , मानेवर तपकिरी , काळ्या - पिवळ्या रंगाच्या रेघा आणि खलचा भाग पांढरा शुभ्र ही चिऊताईची सहज ओळख सांगता येईल . जमिनीवर पडलेले धान्य , बी , दाणे , इतकेच काय ; तर घरातील पोळ्या देखील खाणारी ही चिऊताई पर्यावरणपूरक कामही करते . ज्या गावात घोडे , म्हशी जास्त तिथे चिमण्यांची संख्या जास्त . कारण या प्राण्यांच्या विष्टेत पचलेले धान्य त्या खातात . तसेच पिकांचा नाश करणाऱ्या या असंख्य कीटकांना खाऊन त्या शेतकऱ्यांच्या मित्रच बनल्या आहेत . पण आता या चिमण्यांवर संक्रांत आली आहे . सातत्याने घरटी बंधणाऱ्या या , चिवचिवाणाऱ्या चिमण्या अचानक शहरातून हद्द पार झाल्या आहेत . काळाबरोबर गाव , शहरे बदलू लागली आहेत . जुनी लाकडी घरे , वाडे , गुरांचे गोठे काळाबरोबर नाहीसे झाले आहेत . त्याजागी चकाचक बंगले , गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या आहेत . घरात चिमणी किंवा एखादे पाखरू घुसले तरी इन्टेरियर खराब होईल म्हणून बिचाऱ्यांची हाकलपट्टी होते . जुन्या घरांबरोबर चिमण्यांचे घरटेही वाहून गेले आहे . जसजशी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसतसा माणूसही बदलतोय . त्याला पक्षांचे काय ....?

चिमण्यांच्या संख्येत मोठी घट

पक्षांचे संवर्धन करणाऱ्या एका संस्थेच्या अहवालानुसार चिमण्यांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पुढे आले आहे . ही घट जैव विविधतेवर घाला घालणारी ठरणार आहे . चिमण्याच्या संख्येत घट होणार या अनेक कारणात शहरात उभे असलेले मोबाइल टॉवेर ही देखील एक समस्या आहे . टॉवेरमधील विद्युत चुंबकीय लहरी ( अल्क्ट्रा मॅग्नेटिक वेव्ह ) पक्षांना हानीकारक ठरत आहेत . पण प्रत्यक्ष पुरावा नसल्याने त्यांच्यावर कार्यवाही करता येत नसल्याची खंत पक्षीप्रेमींनी बोलून दाखविली . या लहरींमुळे चिमण्या आपली वसतीस्थाने बदलत आहेत . ते पर्यावरणासाठी घातक आहे . तसेच शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोडही तितकीच जबाबदार आहे .

शिकारी पक्ष्यांकडून शिकार

महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो झाडे तोडली गेली अन् त्यावर वास्तव्य करणारे ससाणा , घारीसारखे शिकारी पक्षी शहरात येऊन घरटी बनवू लागले . त्यामुळे हे शिकारी पक्षी चिमणीच्या आकाराच्या छोट्या पक्षांची शिकार करू लागले आहेत . त्यामुळे निसर्ग साखळीही धोक्यात येऊ लागली आहे . चिमण्या शक्यतो आयुष्यभर आपल्या ठराविक मर्यादित क्षेत्रातच राहतात . कारण त्याजागेत कुठे फूल येणार , कुठल्या झाडाला कधी फळ येणार , पाण्याची जागा , अंघोळीची जागा , योग्य निवारा अशा सर्व बाबी त्यांना माहीत असतात . त्यामुळे त्यांचे आयुष्य सोपे सुखकर होते .

फटाक्यांच्या आवाजामुळेही स्थलांतर

दिवाळीच्या उत्सवात आपण मोठ्या प्रमाणात फटाके उडवितो . पण या प्रचंड आवाजाने पक्षी घाबरत असतात ते आपले वस्तीस्थळे सोडून शहर सोडून निघून जातात . त्यात काही रस्त्यात दमून भागूण पडतात ; तर काहींचा जीवही जातो . तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे अनेक पक्षी नैसर्गिक आवाजाऐवजी मोठ्याने ओरडू लागले आहे . ही पक्ष्यांच्या संवर्धनात धोक्याची घंटा आहे . ध्वनीप्रदूषण आता चिमण्यांच्या मुळावरच उठत आहे . आदिवासी पाड्यांवर फेरफटका मारला असता , तेथील प्रत्येक मुलांच्या हातात गलोर दिसते . या गलोरीने आतापर्यंत हजारो पाखरांचा बळी घेतला आहे . गलोरीवर बंदी येत नाही , तोपर्यंत निष्पाप पक्षांचे जीव जातच राहणार . आदिवासी पाड्यातील मुले पक्षांच्या पिल्लांबरोबर खेळतात . त्यामुळेही चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत .

जागतिक चिमणी दिनाची सुरुवात भारतातून

सकाळी दार उघडल्यावर चिवचिवणाऱ्या या चिमण्या आता शहरातून हद्दपार होऊ लागल्या आहेत . आधुनिक जीवनशैलीत माणसाला दुर्मिळ झालेल्या या चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा परत मिळविण्यासाठी नाशिकच्या ' नेचर फॉर एव्हर सोसायटी ' चे अध्यक्ष मोहम्मद दिलावर यांनी प्रथम ' वर्ल्ड स्पॅरो डे ' ची सुरवात केली आहे . ही बाब नाशिककरांसाठी भूषणाह आहे . जगात हा दिवस साजरा होतो याचे श्रेय नाशिकच्या मोहम्मद दिलावर यांनाच जाते . या विषयावर ' मटा ' शी बोलताना दिलावर म्हणाले की , जागतिक चिमणी दिनाची स्थापना २०१० मध्ये दिल्ली येथे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आली . तेव्हापासून हा दिवस जगात उत्साहात साजरा केला जातो . चिमण्यांविषयी जनजागृती संवर्धन व्हावे हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले . दरवर्षी विविध शहरात हा दिवस साजरा केला जातो . यंदा मुंबईची निवड झाली आहे . तेथे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत . चिमण्यांच्या घटत्या प्रमाणाविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले की , पेस्ट्रीसाइडमुळे कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि या कीटकांवर जगणाऱ्या या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . तसेच वाड्यांची जागा टाऊनशिपने घेतली आहे . बिल्डिंगचा आकार असा आहे की , चिमण्यांना घुसायला जागा नाही . मग त्या कशा काय जगणार , असा प्रश्न निर्माण होतो . पूर्वी सर्वत्र ओपन मार्केट असायचे . त्यामुळे चिमण्या दुकानात घुसून धान्य खायच्या . पण आता चिमण्यांना तसे करणे शक्य नाही . यासाठी आम्ही ' नेस्ट बॉक्स ' ही संकल्पना सुरू केली . चिमण्यांची काळजी घेणाऱ्या गरजवंताना त्याची माहिती दिली जाते . नायलॉन मांजामुळेही चिमण्या कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . पक्षांची संख्या वेगाने घटत असून या समस्येवर गांभीर्याने काम केले नाही तर भविष्यात परिस्थिती हातबाहेर जाईल . वाघ , गिधाडे दुर्मिळ होतायत त्यांच्या संवर्धनासाठी आपण उपाय योजना करतो , पण आपल्या घरात अंगणात बागडणाऱ्या चिमण्यांकडे आपले लक्ष नाही . ही शोकांतीकाच म्हणावी लागेल . निदान आपण आपल्या गॅलरीत , अंगणात त्यांना पिण्यासाठी पाणी , दाणे नक्कीच ठेवू शकतो आणि शहरात त्यांचा कमी झालेला चिवचिवाट नक्कीच वाढवू शकतो . नाही का !
काय करायला हवे .....

- अंगणात , गॅलरीत पिण्यासाठी पाणी आणि दाणे ठेवणे

- कृत्रिम घरटे लावून आसरा देणे

- ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे

- शहरातील टॉवरचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घेणे

- घराजवळ बागेत प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावणे

- जखमी पक्षांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे

- चिमणीबचाव पर्यावरणबचाव उपक्रम राबविणे

- गलोरीवर कायमची बंदी घालणे

- नायलॉन मांजावर बंदी घालणे

  प्रिंट करा  सेव करा

 ई-मेल करा

 प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा प्रतिसाद
या विषयावर पत्र लिहिणारे तुम्ही पहिलेच
इस सेक्शन की खबरें
मुंबई

आणखी »

Navbharat Times
विराट कोहलीने तडाखेबंद फलंदाजीकरत भारताला विजय मिळवून दिला.
पाकविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनं अर्धशतक साजरं केलं. (स्कोअरकार्ड)
पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीवर आजपासून लेपन करणार
मी योग्य वेळी निवृत्ती घेईन - सचिन
सचिननं शतकांच्या शतकाचा विक्रम साकारला!
बजेटः करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दोन लाखांवर
विडिओ पाहा | राशिभविष्य | फोटोगॅलरी
मटा बटन | 'मटा'च्या साइटवर करा मराठी टायपिंग | 
विडिओ आणखी विडिओ »
मटा विशेष
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवारचा महाराष्ट्र टाइम्स... बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.
आणखी »
क्रीडा
'स्विस मिस' सायना'स्विस मिस' सायना
गतविजेत्या सायना नेहवालने स्विस ओपन ग्रां प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पधेर्चे विजेतेपद पुन्हा आपल्याकडेच राखले आहे.
आमची शिफारस
भविष्य
भविष्यआता आकाशातले ग्रहतारे मराठी महाजालात अवतरून तुमचं रोजचं राशिभविष्य मराठीत...
अर्थ
शेअर बाजार
अन्य सूचकांक  |  बाजारातील आकडेमोड
  
ET Portfolio Wizard.ET Portfolio Wizard
हिट लिंक
Shop
38% Off on BELKIN Laptop Cooling Pad Rs. 999
38% Off on Set of 10 Khadi Soaps Rs. 499
आणखी »
Travel : Air Tickets
Delhi - Mumbai Rs. 1715
Mumbai - Sharjah Rs. 6565
आणखी »
Mobile 58888
update.gif
Play Bollywood Nishana
Tambola on your mobile
आणखी »
select